अंतर्गत हालचाली Go Back प्रस्तावना views 4:20 अंतर्गत हालचाली. म्हणजे जमिनीच्या आतील भागात होणाऱ्या हालचाली. त्यामुळे भूपृष्ठावर काय परिणाम होतो याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. या पाठाची सुरुवात नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाच्या बातमीने करू. ज्याप्रमाणे पृथ्वीवर काही वेळेस वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी होत असतात, उदाहरणार्थ. महापूर, वादळे, हिमवर्षाव, अतिवृष्टी त्याचप्रमाणे पृथ्वीच्या अंतर्गत भागात म्हणजे भूपृष्ठाखाली सुद्धा अंतर्गत हालचालींमुळे भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक यांसारख्या नैसर्गिक घडामोडी घडतात. पृथ्वीवरील सजीवांसाठी या घडामोडी म्हणजे आपत्तीच असतात. यांना नैसर्गिक आपत्ती म्हणतात. यांच्यामुळे मनुष्यहानी आणि मालमत्तेची हानी होते. मुलांनो, आपण या पाठात याच अंतर्गत हालचालींची ओळख करून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला अंतर्गत भूहालचाली चांगल्याप्रकारे समजतील तसेच त्यामुळे भूकंप कसा होतो हेही समजेल. प्रस्तावना भूकंप व ज्वालामुखी मंदभू-हालचाली वली पर्वत खंडनिर्माणकारी हालचाली भूकंपनाभी व अपिकेंद्र भूकंपमापन यंत्र ज्वालामुखी नकाशाशी मैत्री ज्वालामुखीचे परिणाम