अंतर्गत हालचाली Go Back भूकंप व ज्वालामुखी views 3:48 भूकंप: भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. हा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर मोकळा होतो. तेथून ऊर्जेचे उत्सर्जन होते. म्हणजे ऊर्जा विवध दिशांनी बाहेर फेकली जाते. त्यातून ऊर्जालहरी निर्माण होतात. आणि ऊर्जेच्या उत्सर्जनामुळे भूपृष्ठ कंप पावते, म्हणजेच भूकंप होतो. या भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककात भूकंपमापन यंत्राने मोजतात. ज्वालामुखी: पृथ्वीच्या प्रावरणातून म्हणजे भूकवचाखालील भागातून तापलेले द्रव पदार्थ, घन म्हणजे धूळ किंवा इतर गोष्टी आणि वायुरूप पदार्थ म्हणजे धूर, यांसारखे पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडत असताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इ. पदार्थ बाहेर फेकले जातात. पृथ्वीच्या अंतर्गत भागात असणाऱ्या शिलारसास भूपृष्ठावर आल्यावर लाव्हारस म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या स्वरूपानुसार त्याचे दोन प्रकार पडतात. केंद्रीय व भेगीय ज्वालामुखी. १) केंद्रीय ज्वालामुखी: ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना तप्त शिलारस भूपृष्ठाच्या आतील भागातून एखाद्या मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. भूपृष्ठावर आलेला हा लाव्हारस या नलीकेच्या मुखाभोवती पसरतो, त्यामुळे शंकूच्या (∆) आकाराचे पर्वत तयार होतात. उदा. जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलीमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत. २) भेगीय ज्वालामुखी: ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडयांमधून किंवा भेगांमधून बाहेर पडतो, तेव्हा त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ भेगांच्या दोन्ही बाजूस पसरतात. त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील आपण राहतो ते दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे. प्रस्तावना भूकंप व ज्वालामुखी मंदभू-हालचाली वली पर्वत खंडनिर्माणकारी हालचाली भूकंपनाभी व अपिकेंद्र भूकंपमापन यंत्र ज्वालामुखी नकाशाशी मैत्री ज्वालामुखीचे परिणाम