शर्थीने खिंड लढवली Go Back बाजीप्रभूचा बाणेदारपणा views 03:02 रागाने पिसाळलेले सिद्दीचे सैनिक जोराने खिंडीकडे येत होते. शिवरायांना पन्हाळगडावरून निसटून विशाळगडावर जायचे होते. परंतु त्यांना वाटले, आता विशाळगड गाठणे कठीण आहे. शत्रू आपल्या जवळ येऊन पोहचला आहे. कोणत्याही क्षणी तो आपल्यावर हल्ला करेल. ते बाजीप्रभूला म्हणाले, “बाजी, अवघड वेळ आहे. पुढील वाट चढणीची. मागे शत्रू असताना ही चढण चढणे अवघड आहे. आता आपल्या हाती विशाळगड लागत नाही. चला, शत्रूला उलटून तोंड देऊया.’’ शिवरायांच्या लक्षात आले होते. की आता शत्रूशी दोन हात करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. शिवाजी पूर्णपणे हतबल झाले होते. त्यांना काही मार्ग सापडत नव्हता. शिवरायांच्या मनाची अवस्था बाजीप्रभूंनी ओळखली. खिंडीकडे शत्रू चवताळून बेभान होऊन येत होता. शिवरायांचे प्राण धोक्यात होते. शिवरायांना काही झाले तर साऱ्या स्वराज्याचे नुकसान होणार होते, बाजीप्रभूंच्या ही गोष्ट लक्षात आली. बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले.’’ महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो. महाराज, मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल, पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे. आपले सैन्य थोडे आहे. शत्रूचे सैन्य अफाट आहे. त्यांच्यासमोर आपला निभाव लागणार नाही. तुम्ही येथे क्षणभरही थांबू नका. आम्ही शत्रूला खिंडीत रोखून धरतो. तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत शत्रूला आम्ही येथेच थोपवू. मुलांनो, केवढी ही स्वामीनिष्ठा! आपल्या राजासाठी प्राण दयायला मागे-पुढे न पाहाणारे एवढे एकनिष्ठ मावळे क्वचितच एखादया राजाला मिळाले असतील. बाजींना माहीत होते हजारो मेले तरी चालतील पण हजारोंचा पोशिंदा मरता कामा नये. म्हणूनच बाजी प्रभूंनी आपल्या जीवाची पर्वा न करता शिवरायांना विशाळगडाकडे पाठविले. बाजीप्रभूंची स्वामिभक्ती बघून शिवरायांचे मन गहिवरून आले प्रस्तावना, पन्हाळा जिंकला आणि आदिलशाहा चिडला पन्हाळगडाचा वेढा शिवराय वेढ्यातून बाहेर बाजीप्रभूचा बाणेदारपणा बाजीने शत्रूला रोखले बाजीचा पराक्रम