पिण्याचे पाणी

प्रस्तावना

views

3:59
जगण्यासाठी आपल्याला विविध गोष्टींची गरज असते. त्या पूर्ण झाल्याशिवाय आपण व्यवस्थित जगू शकत नाही. उदा. हवा, पाणी, अन्न, वस्त्र निवारा या महत्त्वाच्या गरजा आहेत. पाण्याविना आपण जगण्याची कल्पनाच करू शकत नाही. पाणी आपल्याला विविध कारणांसाठी उपयोगी पडते. घरगुती वापरासाठी, पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगधंद्यांसाठी. अशा विविध कारणांसाठी आपण पाण्याचा उपयोग करतो. यातील सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे पिण्यासाठी! आपण जे पाणी पितो ते स्वच्छ असते का? तुम्ही म्हणाल स्वच्छ असते म्हणून तर पितो. बरोबर आहे. आपण आपल्या डोळ्यांना स्वच्छ दिसणारेच पाणी पितो. परंतु ते पाणी खरंच स्वच्छ असेल असे नाही. कारण बऱ्याच वेळा पाण्यात डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म जीव असतात. ते आपल्या शरीराला हानी पोहचवतात. पण हे सूक्ष्मजीव आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतींचा वापर करून पाण्यातून बाजूला काढू शकतो. त्या पद्धती कोणत्या ते आपण या पाठात पाहणार आहोत.