पृथ्वीवरील सजीव Go Back पृथ्वीवरील प्राणि सृष्टी views 3:06 सजीव हे दोन प्रकारचे असतात. वनस्पती आणि प्राणी. पृथ्वीच्या जमिनीवर वनस्पतींच्या स्वरूपात तर पाण्यात आदिजीवांखेरीज अन्य प्रकारचे प्राणी तयार होऊ लागले. तर मुलांनो, या दोन प्रकारांतील सजीवांपैकी आपण पृथ्वीवरील प्राण्यांचा विचार आता करणार आहोत. सुमारे २८ कोटी वर्षांपूर्वी साप व तत्सम सरपटणार्याय प्राण्यांचा विकास झाला. सुमारे २५ कोटी वर्षांपूर्वी डायनासॉर या महाकाय प्राण्याचा जन्म झाला. या प्राण्याचे पृथ्वीवर दीर्घकाळ अस्तित्व होते. प्राणी श्वास घेतात म्हणजेच ते श्वासोच्छ्वास करतात. तसेच ते अन्न मिळविण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. काही सजीव हे अंडी घालतात तर काही त्यांच्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करतात. उदाहरणार्थ गाय तिच्या वासराला जन्म देते. तर कोंबडी अंडे देते. ती अंडी ती उबवते आणि मग काही दिवसांनी त्यातून छोटी पिले बाहेर येतात. तर अशी विविध वैशिष्ट्ये आपल्याला प्राण्यांमध्ये आढळून येतात. प्रस्तावना, पृथ्वीची उत्पत्ती पृथ्वीवरील प्राणि सृष्टी