परिमेय व अपरिमेय संख्या

परिमेय व अपरिमेय संख्या

views

5:03
प्रस्तावना: मुलांनो, आपण संख्यांच्या प्रकारांबद्दल यापूर्वी माहिती घेतली आहे. त्यात नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यांची माहिती घेतली होती. थोडी उजळणी म्हणून आपण या संख्यांचा अभ्यास करूया. १) नैसर्गिक संख्या: नैसर्गिक संख्या १ पासून सुरू होतात व त्यापुढे असंख्य असतात. उदा. 1,2,3,4,5,6,7,8.... 1 ही सर्वात लहान संख्या असते व सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही.२) पूर्ण संख्या: पूर्ण संख्यांची सुरुवात शून्यापासून होते व पुढे त्या असंख्य असतात उदा. o,1,2,3,4,5,6,7,8.... सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य व सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही. सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असतात. ३)पूर्णांक संख्या: मुलांनो, पूर्णांक संख्यांमध्ये नैसर्गिक व पूर्ण संख्या असतातच, परंतु या संख्या समूहात धन संख्यासोबत ऋण संख्यांचा देखील समावेश होतो. उदा. -5,-4,-3,-2,-1,0,1,2,3,4,5,...........परिमेय संख्या: मुलांनो, आता आपण परिमेय संख्या म्हणजे काय ते समजून घेऊया. जर m ही पूर्णांक संख्या व n ही शून्येत्तर पूर्णांक संख्या असेल तर m/n या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. उदा. 6/5 ही परिमेय संख्या आहे.