सागरतळ रचना

समुद्रसपाटी

views

4:29
कोणत्याही ठिकाणची उंची व खोली त्या भागातील समुद्रसपाटीपासून मोजली जाते. समुद्रसपाटीपासूनची जास्तीत जास्त भरतीची पातळी व ओहोटीची पातळी यांच्यातील सरासरी काढून निश्चित केली जाते. ती कशा रीतीची असते, हे आकृतीत दाखविले आहे. यांची जी सरासरी काढलेली असते, त्या उंचीस शून्य मानले जाते. त्या उंचीपेक्षा अधिक उंच असलेल्या ठिकाणांना धनात्मक स्वरूपात सांगितले जाते. म्हणजेच भूपृष्ठावरील ठिकाणे घनात्मक स्वरुपात व उंचीत सांगितली जातात. तर कमी उंचीची ठिकाणे म्हणजे समुद्रसपाटीपासून खाली असणारी ठिकाणे ऋणात्मक स्वरूपात सांगितली जातात. म्हणजेच खोलदऱ्या किंवा समुद्रातील भाग हा ऋणात्मक किंवा खोलीच्या स्वरूपात सांगितला जातो. उदा: भूपृष्ठावरील माउंट एव्हरेस्ट या शिखराची उंची ८८४८ मी. अशी सांगितली जाते. तर समुद्रातील खोल भागात असणारा मारियाना गर्तेची खोली ही ऋणात्मक स्वरुपात म्हणजे -११०३४ मी. अशी सांगितली जाते.आपल्या देशात विविध भूरुपांचे किंवा सागरी खोलींचे सर्वेक्षण करण्यासाठी तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील समुद्रसपाटीची सरासरी उंची शून्य मानली जाते. म्हणजेच भारतातील विविध भूरूपांची उंची व सागराची खोली चेन्नई येथील समुद्रसपाटीपासूननची उंची शून्य आहे असे गृहीत धरून मोजली जाते.