त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा

त्रिकोणाच्या मध्यगासंपातबिंदूचा गुणधर्म

views

4:53
त्रिकोणाच्या मध्यगासंपातबिंदूचा गुणधर्म: मुलांनो, ∆ABC हा कोणताही मोठा त्रिकोण काढा. ∆ABC च्या रेख AR, रेख BQ व रेख CP मध्यगा काढा. आणि त्यांच्या संपातबिंदूला G नाव द्या. मुलांनो, आपण प्रथम ∆ABC काढून त्याच्या मध्यगा काढल्या. आणि आता त्यांचे मापन करू. पहा काय दिसते आहे? तर असे दिसते की, रेख AG = 2 cm रेख GR = 1 cm रेख BG = 2 cm रेख GQ = 1cmरेख CG = 2cm रेख GP = 1cm म्हणजेच ही गुणोत्तरे 2:1 आहेत.मुलांनो, त्रिकोणाच्या मध्यगा एकसंपाती असतात. त्यांच्या संपातबिंदूस मध्यसंपात (Centroid) म्हणतात. तो G या अक्षराने दर्शवला जातो. कोणत्याही त्रिकोणात G चे स्थान त्रिकोणाच्या अंतर्भागात असते. संपातबिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते.