ऐतिहासिक काळ

प्रस्तावना

views

4:51
इतिहासाच्या काळाची विभागणी दोन टप्प्यांमध्ये केली जाते: प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ. प्रागैतिहासिक काळ म्हणजे ज्या काळातील इतिहास लिहिण्यासाठी लिखित साधने उपलब्ध नसतात, तो काळ. उदा: त्याकाळचे ग्रंथ, पुस्तके, भूर्जपत्रे, शिलालेख इत्यादी गोष्टी उपलब्ध नसतात. तर ऐतिहासिक काळातील इतिहास लिहिण्यासाठी असे काही लिखित पुरावे उपलब्ध असतात. जगामध्ये ज्या नागरी संस्कृती होत्या, त्या सर्वांमध्ये वेगवेगळ्या लिपींच्या आधारे लेखन केले जात होते. म्हणजेच नागरी संस्कृतीच्या निर्मितीबरोबर नवाश्मयुगाचा प्रागैतिहासिक काळ संपला आणि ऐतिहासिक काळ सुरु झाला, सुबक दगडी हत्यारे बनविण्याचा कालखंड, हा प्रागैतिहासिक काळात येतो. याच्या नंतर नवीन काळ सुरू होतो. तो म्हणजे ऐतिहासिक काळ होय.