ऐतिहासिक काळ

इजिप्त संस्कृती

views

2:42
मेसोपोटेमिया संस्कृती ही युफ्रेटीस नदीकाठी विकसित झाली. त्याचप्रमाणे आफ्रिका खंडातील नाईल नदीकाठी इजिप्तमधील संस्कृती विकसित झाली. आफ्रिका खंडातील उत्तरेला जगातील सर्वात मोठे सहारा वाळवंट आहे. या वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी वाहते. ऐतिहासिक काळापासून इजिप्तमधील जीवन संपूर्णपणे नाईलवर अवलंबून आहे. इजिप्तमधील शहरे व गावे प्रामुख्याने नाईलच्या काठावरच वसलेली आहेत. नाईल नदी पावसाळ्यात येणाऱ्या पुराच्या वेळेस आपल्याबरोबर वाहून आणलेला गाळ नदीकाठांवर आणून टाकते. त्यामुळे तिच्या काठावरील जमीन अत्यंत सुपीक झालेली आहे. इजिप्त संस्कृतीतील लोक नाईल नदीला पूर आल्यानंतर त्यावर बंधारे बांधून पाणी आडवित. त्या पाण्यातील गाळ म्हणजेच माती, कचरा खाली तळाला गेल्यानंतर ते पाणी शेतीसाठी वापरत असत. इजिप्त संस्कृती ही पिरॅमिड्ससाठी प्रसिद्ध आहे. आज काही पिरॅमिडची पडझड झाली असली तरी बरेच पिरॅमिड्स सुस्थितीत आहेत. अशी इजिप्त संस्कृती होती.