नैसर्गिक आपत्ती

प्रस्तावना

views

4:44
प्रस्तावना : मुलांनो, माणसावर अनेक प्रकारची संकटे येतात. काही संकटे मानवनिर्मित असतात. उदाहरणार्थ, युद्ध, अणुबॉम्बचा स्फोट यांसारखी. तर काही संकटे ही निसर्गनिर्मित म्हणजे पूर, महापूर, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, चक्री वादळे, त्सुनामी यांसारखी असतात. त्यांना नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात. या नैसर्गिक आपत्तींविषयीची माहिती आपण या पाठातून घेणार आहोत. नैसर्गिक आपत्ती :- नैसर्गिक आपत्ती या बऱ्याच प्रकारच्या असतात. अशा नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक प्रकारच्या वाईट घटना घडतात. त्यांना दुर्घटना असे म्हणतात. उदा. भूकंपामुळे लोकांची घरे, इमारती, कोसळतात, रस्ते दुभंगतात. त्यांची मोडतोड होते. अतिवृष्टीमुळे कुठे पूर येतात. लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. लोक ज्याप्रमाणे आपले जीवन जगत असतात, त्यात खंड पडतो. लोक व त्यांचे सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून येते. अशा आपत्ती येऊन गेल्यानंतर त्याठिकाणी परिस्थिती परत पूर्वी सारखी होण्यासाठी अनेक दिवस लागतात. उदा. ३० सप्टेंबर १९९३ मध्ये लातूर जिल्हयातील किल्लारी येथे भूकंप झाला. त्या ठिकाणचे लोक किती तरी वर्षे तो भूकंप विसरू शकले नाहीत. आणि त्यातून सावरू शकले नाहीत. कारण उद्धवस्त झालेले संपूर्ण गाव नव्याने उभारायचे होते.