पुरंदरचा वेढा व तह

सुरतेवर छापा

views

4:35
मुलांनो, शायिस्तेखानाला पुण्यातून पळवून लावून महाराजांनी औरंगजेबाला चांगलाच धडा शिकवला होता. एवढा मोठा विजय मिळाल्यानंतर गप्प बसतील ते शिवाजी महाराज कसले? शायिस्ताखान पळून गेला असला तरी औरंगजेब बादशाहाच्या फौजा महाराष्ट्रात स्वाऱ्या करून रयतेचे व स्वराज्याचे नुकसान करीत होत्या. तेव्हा बादशाहाला धडा शिकविलाच पाहिजे असे महाराजांना वाटले. त्यासाठी त्यांनी एक मोहीम आखली ती म्हणजे सुरतेवर छापा घालायचा. छापा टाकण्यासाठी महाराजांनी सुरत हे शहरच का निवडावे? कारण सुरत हे मुघल साम्राज्याचे अत्यंत मोठे, सुरक्षित व श्रीमंत असे शहर होते. मुघल साम्राज्याची राजधानी दिल्ली होती. दिल्ली खालोखाल दिमाख होता तो सुरत शहराचा. सुरतेची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी महाराजांनी आपल्या हेरखात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक यास पाठविले. बहिर्जीने सुरतेची संपूर्ण माहिती महाराजांना अगदी बिनचूक दिली. त्या माहितीच्या आधारे महाराजांनी सुरतेवर छापा टाकला. कारण औरंगजेबाच्या सैन्याने गेली अनेक वर्षे स्वराज्याचे मोठे नुकसान केले होते. या सर्वाची भरपाई महाराजांना सुरतेतून वसूल करायची होती. लक्षावधी रुपयांची लूट त्यांनी छाप्यातून मिळवली. मुलांनो, आपण मागील पाठांतून पाहिले, की अफजलखान किंवा मुघल सरदार हे जेव्हा स्वराज्यावर चालून आले तेव्हा त्यांनी मंदिरे, देवालये, इतर धार्मिक स्थळे यांची प्रचंड नासधूस केली होती.