बादशहाच्या हातावर तुरी दिल्या

बादशाहाची दगलबाजी

views

3:54
बादशाहाची दगलबाजी: औरंगजेबाने शिवरायांचा मुक्काम असलेल्या ठिकाणाभोवती शिपायांचा कडक पहारा बसविला. शिवराय आणि संभाजी राजे यांना आपल्या नजरकैदेत ठेवले. नजरकैदेत ठेवणे म्हणजे चोवीस तास त्या व्यक्तीवर नजर ठेवणे. महाराजांनी ओळखले, की बादशाहाने आपला विश्वासघात केला, त्याने आपल्याला फसविले. आपण नजरकैद झालो आहोत. आता तो आपल्याला सोडणार नाही. त्यांनी ठरविलेल्या बेतानुसार महाराजांनी औरंगजेबाला एक अर्ज केला. त्यात त्यांनी बादशाहाला उद्देशून लिहिले होते, की तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही झाले आहे. मी आता तुझ्या नजरकैदेत आहे. त्यामुळे मी माझ्याबरोबर आणलेल्या सैन्याचा आता मला काहीच उपयोग नाही. त्यामुळे ही माणसे त्यांच्या त्यांच्या घरी पाठवून द्यावीत. त्यामुळे तुमचाही त्यांच्या वरील अन्नपाण्याचा व इतर गोष्टींचा खर्च वाचेल. बादशहाला हा अर्ज वाचून आनंदच झाला. त्याला वाटले बरे झाले, शिवाजीचे सैन्य कमी झाले. म्हणजे त्याचे बळ कमी झाले. त्याने लगेच या गोष्टीला परवानगी दिली. महाराजांनी बादशाहाला अर्ज केला. माझे आता काही खरे नाही. माझा आजार कशानेच बरा होत नाही. माझा आजार बरा व्हावा म्हणून मी आग्र्यातील गोरगरिबांना, साधूंना व मौलवी लोकांना मिठाई वाटू इच्छित आहे. त्यांच्या आशीर्वादाने माझा आजार बरा होईल, असे मला वाटते. बादशाहाही लगेच तयार झाला. त्याने महाराजांना मिठाई वाटण्यास परवानगी दिली.