वर्तुळ Go Back प्रस्तावना views 4:14 प्रस्तावना: मुलांनो, मागील इयत्तेत आपण वर्तुळ कसे काढायचे, वर्तुळाचे विविध घटक, व्यास, त्रिज्या यांचा परस्पर काय संबंध आहे याचा सविस्तर अभ्यास केला होता. मग आता त्याची थोडी उजळणी करूया. वर्तुळाचा परीघ (Circumference of a circle): मुलांनो, आता आपण वर्तुळाच्या परिघाविषयी माहिती घेणार आहोत. वर्तुळाकार असलेली तारेची ही एक बांगडी आहे. या बांगडीला जर आपण एका बाजूने कट करून ती वर्तुळाकार बांगडी सरळ केली तर एक सरळ तार तयार होईल. या तारेची जेवढी लांबी असेल ती त्या वर्तुळाचा परीघ असेल. वर्तुळाच्या कडेच्या लांबीला परीघ असे म्हणतात. परीघ व व्यास संबंध: परीघ आणि व्यास यांचा संबंध काय आहे, तर कोणत्याही वर्तुळात परीघ व व्यास यांचे गुणोत्तर स्थिर असते. तसेच वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या व्यासाशी असलेले गुणोत्तर तिपटीपेक्षा किंचित जास्त असून जवळपास स्थिर असते. प्रस्तावना उदाहरणे (1) उदाहरणे (2) वर्तुळकंस उदाहरणे (3)