चला वृत्ते वापरुयात

दिनमान – रात्रमान

views

4:14
दिनमान व रात्रमान याविषयी जाणून घेऊयात. ६६०३०’` उत्तर अक्षवृत्तापासून ९०० उत्तरध्रुव व ६६०३०`’ दक्षिण अक्षवृत्तापासून ९०० दक्षिण ध्रुवापर्यंत, या भागात दिवस ॠतूंप्रमाणे २४ तासांपेक्षा जास्त असू शकतो. हा दिवसाचा कालावधी किंवा रात्रीचा कालावधी कोणत्याही ध्रुवावर जास्तीत जास्त ६ महिन्याचा असतो. येथे दिवसाच्या काळात आकाशात सूर्य क्षितीज समांतर दिसतो म्हणजे पृथ्वीला टेकला आहे असा दिसतो.सर्व अक्षवृत्तीय मर्यादा या पृथ्वीचा व्यास २३०३०`’ कलण्याशी संबधित आहेत. पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे व पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हा फरक होतो. २२ मार्च ते २३ सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते. म्हणून उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. याच काळात दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते. म्हणजेच रात्र मोठी असते. त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते म्हणून दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो.२३ सप्टेंबर ते २२ मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते. त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते. त्यामुळे या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. उत्तर गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते. त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते. परिणामी उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. सूर्यकिरणांचा कालावधी व तीव्रता यांनुसार पृथ्वीवर विविध तापमानांचे पट्टे (कटिबंध) तयार होतात.उदा.:- शीत कटिबंध, उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध.सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेमुळे होणारा परिणाम म्हणजे प्रदेशानुसार वनस्पती आणि प्राणी यांमध्ये विविधता आढळून येते..उदा.:- बर्फाळ प्रदेशात- केसाळ प्राणी व सूचीपर्णी वनस्पती आढळतात. तर वाळवंटी प्रदेशात- उंटासारखे, पाणी शरीरात साठवून ठेवणारे प्राणी आणि काटेरी वनस्पती आढळतात.