पोषण आणि आहार

स्निग्ध पदार्थ

views

4:8
आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थ निरनिराळी तेलं, तूप, लोणी, चरबी, इत्यादी पदार्थातून मिळतात. स्निग्ध पदार्थाची कामे दोन प्रकारची असतात, एक म्हणजे उर्जा पुरवणं , दुसरे काम म्हणजे शरीरातल्या काही कामांत आवश्यक घटक म्हणून भाग घेणं. स्निग्ध पदार्थ प्राणिज आणि वनस्पतिज अशा दोन प्रकारांचे असतातनाप्राणिज स्निग्ध पदार्थां ‘ वसा’ म्हणतात. लोणी ,तूप, अंडी हे प्राणिज स्निग्ध पदार्थ होत. वनस्पतिज स्निग्ध पदार्थांत खाद्य तेलांचा भुईमूग, तीळ, करडई, मोहरी, खोबरे, सरकी सूर्यफूल, सोयाबीन इत्यादींच्या तेलांचा समावेश होतो. अन्नापासून मिळणाऱ्या उर्जेचे मूल्य किलोकॅलरी या एककात मोजतात.