उष्णता

प्रसरण आणि आकुंचन

views

5:57
स्थायू पदार्थाचे होणारे प्रसरण व आकुंचन :प्रथम आपण स्थायू पदार्थांचे होणारे प्रसरण आणि आकुंचन कसे होते ते पाहू. उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात आणि उष्णता काढून घेतल्यास ते आकुंचन पावतात. उष्णतेमुळे द्रव पदार्थांचे होणारे प्रसरण आणि आकुंचन :- द्रवाला उष्णता दिली की द्रवाच्या कणांमधील अंतर वाढते आणि त्याचे आकारमान वाढते. याला द्रवाचे प्रसरण होणे असे म्हणतात. तापमान कमी केल्यास त्याचे आकुंचन होते. उष्णतेमुळे होणारे वायू पदार्थांचे प्रसरण आणि आकुंचन :- उष्णता दिल्यामुळे वायूंचे आकारमान वाढते. याला वायूंचे प्रसरण म्हणतात. तर उष्णता काढून घेतल्यास वायूचे आकारमान कमी होते. याला वायूचे आकुंचन म्हणतात. उष्णतेमुळे वायूरूप पदार्थांचे प्रसारण होते. तर उष्णता काढल्याने त्यांचे आकुंचन होते.