गतीचे नियम

विस्थापन – काल संबंधाचे समीकरण

views

4:29
आता आपण विस्थापन आणि अंतर म्हणजे काय ते पाहूया. अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. तर विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय “अंतर म्हणजेच दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय.” “विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूंतील सर्वात कमी अंतर होय.” आरंभबिंदू व अंतिमबिंदू एकच असल्यास विस्थापन शून्य होईल. एखाद्या वस्तूचे विस्थापन शून्य असले तरी त्याच वस्तूने प्रत्यक्षात कापलेले अंतर शून्य नसू शकते.