आहाराची पौष्टिकता

अन्नपदार्थांची पौष्टिकता टिकवणे

views

4:31
आपण जे खाद्यपदार्थ खातो त्यातील पौष्टिकता आपल्या शरीरासाठी किती गरजेची आहे ते आपण पाहिले. खाद्यपदार्थ तयार करताना अनेक उपयुक्त अन्नघटक नष्ट होऊ शकतात. ते नष्ट होऊ नयेत म्हणून पुढीलप्रमाणे आपण काळजी घेऊ शकतो. १)अन्न शिजवताना त्यात जेवढे आवश्यक पाणी आहे तेवढेच पाणी घालावे जास्त पाणी घालून पदार्थ जास्त शिजवले तर त्यातील पोषक घटक नष्ट होतात. २)अन्न प्रेशरकुकरमध्ये शिजवावे त्यामुळे इंधनाची बचत होते. किंवा अन्न शिजवताना त्यावर झाकण ठेवावे त्यामुळे अन्न पटकन शिजते व पोषक घटक बाहेर पडत नाहीत. ३)मटकी, मूग, चवळी यांसारख्या कडधान्यांना मोड आणून ती वापरावी. मोड आलेल्या कडधान्यांत मोड न आलेल्या कडधान्यांपेक्षा जास्त पौष्टिकता असते. परंतु मोड लहान आहेत तोपर्यंतच ती कडधान्ये वापरावीत. मोड लांब होईपर्यंत थांबू नये. ४)मुलांनो, आपल्या घरात चपाती- भाकरीसाठी पीठ चाळून घेतले जाते. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. चाळलेल्या पिठातून जो कोंडा निघतो त्यातच जास्त पौष्टिकता असते. त्यामुळे पीठ चाळून न घेता तसेच वापरावे. ५)चिकू, अंजीर, द्राक्षे, सफरचंद अशी फळे त्यांच्या साली न काढता स्वच्छ धुऊन सालीसहित खावीत. ६) गाजर, मुळा, काकडी, बीट यांसारख्या भाज्या अधूनमधून न शिजवता कच्याच खाव्यात किंवा त्याची कोशिंबीर करून खावी. ७)जमेल तेव्हा दोन-तीन पदार्थ एकत्र करून त्यांचे विविध पदार्थ बनवून खावेत. उदा. उसळीत कांदा व बटाटा यांच्या फोडी करून टाकणे, आमटीत शेवग्याच्या शेंगा टाकणे. एखादी डाळ भिजवून भाज्यांमध्ये टाकणे इत्यादी.