पृथ्वीचे फिरणे

लीप वर्ष

views

3:45
लीप वर्षामध्ये ३६५ ऐवजी ३६६ दिवस असतात. ते तुम्हाला माहीत असेल. दर चार वर्षांनी लीप वर्ष येते. लीपवर्षामध्ये फेब्रुवारी महिना २८ ऐवजी २९ दिवसांचा असतो. त्यामुळे यावर्षी ३६५ ऐवजी ३६६ दिवस लीपवर्षात असतात. हे असे का होते याची माहिती आपण घेणार आहोत. ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे ३६५ दिवस धरतात. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षात सहा तास कमी धरले जातात. म्हणजेच चार वर्षात ६x४ =२४ तास म्हणजेच २४ तासाचा १ पूर्ण दिवस कमी धरला जातो. हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगरियन दिनदर्शिकेत प्रत्येक चौथ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अधिकच दिवस जोडला जातो. त्यामुळे दर चार वर्षांआड ३६५ दिवसांऐवजी ३६६ दिवसांचे वर्ष असते. साधारणपणे दिवसाचे १२ तास व रात्रीचे १२ तास असे भाग केले जातात. परंतु एवढ्याच तासांची रात्र व दिवस नेहमीच असतील असे नाही, त्यात बदल होत जातो. कारण पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे आणि पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हा फरक होतो. त्यामुळे पृथ्वीवर दिन व रात्रीचा कालावधीसारखा नसतो. २२ मार्च ते २३ सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिवसाचा कालावधी जास्त असतो. म्हणजेच या काळात उत्तर गोलार्धात सूर्याची उष्णता जास्त प्रमाणात मिळत असते. कारण पृथ्वीचा कललेला भाग हा सूर्यासमोर असतो. त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते, म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. तर त्याच्या विरुद्ध अवस्था दक्षिण गोलार्धात असते. दक्षिण गोलार्धात मात्र या काळात रात्रमान जास्त असते. म्हणजेच रात्र मोठी व दिवस लहान असतो. त्यामुळे या भागात सूर्याची उष्णता कमी प्रमाणात मिळते. सूर्याची प्रखर उष्णता या भागात या काळात नसते. त्यामुळे दक्षिण गोलार्धात तेव्हा हिवाळा असतो.