पृथ्वीचे फिरणे

चंद्रमास आणि तिथी

views

2:3
अमावास्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्यास चंद्राला १४ किंवा १५ दिवस लागतात. या पंधरवड्याला ‘शुक्लपक्ष’ असे म्हणतात. पंधरवडा म्हणजे पंधरा दिवसांचा कालावधी होय. तर पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित असणारा भाग हळूहळू कमी होऊ लागतो. व पुन्हा १४-१५ दिवसांनी अमावास्या येते. या पंधरवड्याला ‘कृष्णपक्ष’ असे म्हणतात. अशा प्रकारे एका अमावास्येपासून पुढच्या अमावास्येचा काळ सुमारे २८ ते ३० दिवसांचा म्हणजेच एका महिन्याचा असतो. या काळाला ‘चांद्रमास’ असे म्हणतात. चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला ‘तिथी’ म्हणतात.पंधरवडाआमावस्या -------------> पौर्णिमा = शुक्लपक्ष१५ दिवसांचा काळपंधरवडापौर्णिमा -------------> आमावस्या = कृष्णपक्ष१५ दिवसांचा काळ शुक्लपक्ष (१५ दिवस) + कृष्णपक्ष= चांद्रमास (एक महिना)1) पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजेच पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यामुळे पृथ्वीवर दिन व रात्र होतात. 2) पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे म्हणजेच परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यांमुळे पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती होते. 3) चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात. 4) एका अमावस्येपासून पुढच्या अमावास्येपर्यंतच्या काळाला ‘चांद्रमास’ असे म्हणतात. चांद्रमास सुमारे २८ ते ३० दिवसांचा असतो. 5) पौर्णिमेच्या रात्रीनंतर चांद्रमासातील पंधरवडा संपतो. त्या पंधरवाड्याला ‘कृष्णपक्ष’ असे म्हणतात. 6) चांद्रमासातील दिवसांना ‘तिथी’ असे म्हणतात.