मानवाची वाटचाल

प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती

views

3:29
प्रगत म्हणजे ज्याने प्रगती केली आहे असा मानव, सुधारलेला मानव होय. प्रगत मानव म्हणजे ज्याची विचार करण्याची क्षमता वाढली आहे किंवा अधिक विकसित झाली आहे. अशा बुद्धिमान मानवास ‘प्रगत बुद्धीचा मानव’ म्हणतात. याच मानवाला ‘होमो सेपियन सेपियन’ असेही म्हणतात. या मानवाच्या मेंदूची विचार करण्याची क्षमता/ताकत वाढत गेली. तसेच त्याची आकलन क्षमताही वाढत गेली. प्रगत बुद्धीचा मानव म्हणजेच आजचा मानव म्हणजेच आपण सर्वजण. तुम्ही किंवा तुमचे भाऊ, बहीण हे तुमच्या घरातील कोणत्या ना कोणत्या व्यक्तीसारखे दिसतात. म्हणजेच तुमचे रंग, रूप, चेहऱ्याची ठेवण, आरोग्यविषयक काही वैशिष्ट्ये, समस्या इत्यादी गोष्टी तुमच्या पूर्वजांप्रमाणेच असतात. यालाच आनुवंशिकता असे म्हणतात. आणि याच आनुवंशिकतेचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला जनुकशास्त्र असे म्हणतात. या जनुकशास्त्राच्या आधारे असे आढळून आले की, आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानवाचे काही अंश आहेत. म्हणूनच शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघेही आधुनिक मानवाचे पूर्वज होते असे म्हटले जाते.