अश्मयुग : दगडाची हत्यारे

पुराश्मयुग भाग २

views

3:14
ताठ कण्याच्या मानवानंतर शक्तिमान मानवाने या दगडांची हत्यारे बनविण्याच्या तंत्रात अधिक प्रगती केली. आणि त्याने अनेक लहान आकारांची हत्यारे तयार केली. शक्तिमान मानवानंतर बुद्धिमान मानवाने तर दगडी हत्यारे बनविण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली. हत्यारे बनविण्यासाठी त्याने गारगोटीचा दगड, हस्तिदंत या वस्तूंचा उपयोग केला. या वस्तूंच्या मदतीने त्याने दगडापासून लांब, पातळ पाती तयार केल्या. आणि या लांब पात्यांपासून सुरी, तासणी, टोच्या, छिन्नी यांसारखी छोटी हत्यारे तयार केली. बुद्धिमान मानवाने दगडांपासून विविध हत्यारे बनविल्यामुळे त्याला त्याच्या आजूबाजूच्या परिसरातून विविध प्रकारचे अन्न मिळवणे शक्य झाले. त्यामुळे त्याला अन्नाच्या शोधात इतरत्र फिरण्याची गरज राहिली नाही. तो एकाच ठिकाणी काही काळ वास्तव्य करून टोळ्यांमध्ये घरे करून एकत्र राहू लागला. आपल्याला बुद्धिमान मानवाने तयार केलेल्या कलात्मक वस्तू किंवा जी गुहाचित्रे आढळली आहेत त्यावरून असे सांगता येईल की सर्वजण एकत्र राहत असल्याने त्यांच्यामध्ये काही सण, समारंभ साजरे होत होते. वेगवेगळ्या प्रकारचे शंख, हाडे, प्राण्यांचे दात इत्यादींपासून तयार केलेले मणी मिळाले आहेत. म्हणजेच बुद्धिमान मानवाला सौंदर्यदृष्टी होती. तो विविध प्रकारचे दागिने वापरत होता.