दक्षिणेतील मोहीम

गोवळकोंडयाला भेट

views

4:14
गोवळकोंडयाला भेट :- मोहिमेची पूर्वतयारी करून ६ ऑक्टोबर १६७६ या दिवशी दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराज रायगडावरून मोहिमेला बाहेर पडले. महाराज दक्षिण मोहिमेवर निघाल्याचे माहीत झाल्यानंतर गोवळकोंडयाचा अबुलहसन कुतुबशाहा याने महाराजांना भेटीचे आमंत्रण दिले होते. तेव्हा महाराजांनी प्रथम कुतुबशाहाची राजधानी गोवळकोंला भेट देण्याचे व नंतर पुढील दक्षिणेकडील मोहिमेला जायचे अशी योजना आखली. मुलांनो गोवळकोंडा हा किल्ला आजच्या आंध्रप्रदेश या राज्यात आहे. हा किल्ला म्हणजेच पूर्वी कुतुबशाहीची राजधानी होती. शिवराय राजधानी गोवळकोंडा येथे दाखल झाले. लोकांनी त्यांचे मोठया प्रेमाने स्वागत केले. त्यांना बघण्यासाठी लोक गर्दी करून उभे होते. महाराजांनी केलेल्या पराक्रमाच्या बातम्या महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राबाहेरही पसरल्या होत्या. महाराजांनी केलेला बलाढय अफजलखानाचा वध, शायिस्तेखानाची लालमहालात झालेली फजिती, पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांनी करून घेतलेली सुटका, आग्र्याहून महाराजांची झालेली सुटका या सर्व साहसी प्रसंगांची बातमी संपूर्ण देशभर पसरली होती. त्यामुळे लोकांच्या मनात महाराजांविषयी आदर निर्माण झाला होता.