दक्षिणेतील मोहीम

व्यंकोजीराजांची भेट

views

5:02
व्यंकोजीराजांची भेट :- मुलांनो, व्यंकोजीराजे हे शहाजीराजे व त्यांची पत्नी तुकाबाई यांचे पुत्र होते. ते महाराजांचे सावत्र भाऊ होते. महाराजांनी व्यंकोजींना भेटीसाठी बोलावले. व्यंकोजींना महाराजांना भेटण्याची इच्छा नव्हती. काहीशा नाखुशीनेच ते शिवरायांना भेटायला गेले. महाराजांनी व्यंकोजींचा योग्य तो सत्कार केला. तसेच त्यांना समजावून सांगून आपल्या स्वराज्याचे हे काम आहे व ते आपण कशासाठी करीत आहोत, हे सर्व सांगितले. तसेच महाराजांनी त्यांना स्वराज्याच्या कार्यात तुम्हीही आम्हांस मदत करावी, असे सांगितले. महाराज दक्षिणेतील मोहिमेवर होते त्यावेळी काही दिवस व्यंकोजी महाराजांबरोबर राहिले. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तेव्हापासून महाराज सलग तीस-पस्तीस वर्षे कष्टच करीत होते. त्यांना कधीही विश्रांती मिळाली नाही. सततच्या लढाया, स्वाऱ्या, हल्ले चालूच होते. याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला.