संदेशवहन व प्रसार माध्यमे

प्रसारमाध्यमांचे चांगले परिणाम

views

3:22
मुलांनो, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्यातील एक चांगली तर दुसरी वाईट असते. तसेच प्रसारमाध्यमांचेही आहे. प्रथम आपण प्रसारमाध्यमांचे काही चांगले परिणाम पाहाणार आहोत. ते पुढीलप्रमाणे आहेत: १) प्रसारमाध्यमांमुळे आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तींशी सहज संपर्क साधता येतो. उदा. दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट यांसारख्या साधनांचा वापर करून आपण जगातील कोणत्याही कोपऱ्यात राहणाऱ्या व्यक्तीशी पटकन व सहज संपर्क साधू शकतो. . २) माहिती मिळविण्यासाठी व माहिती देण्यासाठी लागणारा वेळ व श्रम यांत बचत होते. उदा. या जलद संदेशवहन साधनांचा शोध लागण्यापूर्वी एखादा निरोप किंवा संदेश देण्यासाठी व्यक्तीला पाठविले जात असे. त्यात वेळ व श्रम खूप जात असे. किंवा टपालाने पत्र पोहोचायलाही बराच वेळ लागत असे. परंतु विविध संदेशवहनाची साधने उपलब्ध झाल्यामुळे वेळ व श्रम यात बचत होऊ लागली. संदेश पटकन पोहचविला जाऊ लागला.