संदेशवहन व प्रसार माध्यमे

प्रसारमाध्यमाचे हानिकारक / वाईट परिणाम

views

3:53
मुलांनो प्रसारमाध्यमांचे जसे चांगले परिणाम आहेत. तसेच काही वाईट परिणामही आहेत. ते कोणते आहेत, त्याची माहिती आपण घेऊ. १) आज आपण पाहतो, की दूरदर्शन, संगणक व मोबाईल याचे अगदी लहानांपासून ते वयोवृध्दापर्यंत सर्वांना वेड लागले आहे. या साधनांचा गरजेपुरताच वापर केला, तर ती वरदान आहेत. नाही तर ती शाप आहेत. यांचा अती वापर केल्याने डोळ्यांचे, पाठीचे व श्रवणाचे म्हणजेच, ऐकण्याचे त्रास होतात. हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही खो-खो, क्रिकेट, फुटबॉल, धावण्याची शर्यत, दोरीच्या उड्या मारणे, सायकल चालविणे, पोहणे, यांसारखे मैदानी खेळ खेळले पाहिजेत. म्हणजे तुमचे शरीर तंदुरुस्त राहील. तसेच तुमच्या सर्व प्रकारच्या शारीरिक क्षमता वाढतील व रोगप्रतिकारकशक्ती वाढेल. अशा प्रकारे प्रसारमाध्यमांचे वाईट परिणाम टाळून आपण आपले शरीर व्यवस्थित ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला पाहिजे.