वस्त्र -आपली गरज

हे नेहमी लक्षात ठेवा

views

4:33
हे नेहमी लक्षात ठेवा - मुलांनो, आपल्या पृथ्वीची संपूर्ण लोकसंख्या ही साधारणपणे ६ ते ७ अब्ज (६00 ते ७00 कोटी) इतकी आहे. एवढया प्रचंड लोकसंख्येची सर्व प्रकारची गरज भागविण्याची क्षमता निसर्गामध्ये आहे. निसर्ग आपल्याला सर्व गोष्टी भरभरून देत असतो. परंतु मानवाची लोभी वृत्ती काही सुटत नाही, त्याची एक गरज भागली, की दुसऱ्या अनेक प्रकारच्या गरजा उत्पन्न होतात, म्हणजेच माणसाची हव्यास वृत्ती वाढली आहे. “हव्यास म्हणजे एखादया वस्तूची गरज नसतानाही ती वस्तू आपल्याकडे असावी म्हणून केली जाणारी धडपड होय.” माहीत आहे का तुम्हांला ? मुलांनो आपल्या महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी होण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे मुंबईतील वस्त्रोदयोग होय. मुलांनो वस्त्रोदयोगातील सर्वात महत्त्वाचा देश म्हणजे इंग्लंड. इंग्लंड या देशात मँचेस्टर हे शहर वस्त्रोदयोगासाठी जगात प्रसिद्ध होते. तर मुंबई हे भारताची मँचेस्टर म्हणून जगात प्रसिद्ध होते. या ठिकाणी कापड गिरण्यांचा विकास होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे इथे असलेले दमट हवामान होय. दमट हवामानामुळे सूत सहजा तुटत नसे. त्यामुळे इथे सूतगिरण्या चालवणे फायदयाचे होई. तेव्हापासून मुंबई हे भारतातील आर्थिक घडामोडींचे महत्त्वाचे केंद्र बनले. अशा प्रकारे मुंबई हे शहर देशाचे आर्थिक राजधानीचे ठिकाण बनले. मुलांनो, आपण या पाठातून पुढील गोष्टी शिकलो. १. वस्तूंची गरज नसताना त्या हव्याशा वाटणे याला ‘हव्यास’ असे म्हणतात. २.निसर्गाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा वापर गरजेनुसार करावा. ३. आपल्या देशातील विविध प्रदेशांना वैशिष्टयपूर्ण अशी वस्त्रनिर्मितीची परंपरा आहे. ४. आपण आपल्या देशातील वस्त्रांमधील विविधता नकाशाच्या साहाय्याने अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतली. अशा प्रकारे आपण या पाठाद्वारे भारतातील विविध वस्त्र प्रकारांचा अभ्यास केला.