स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती

हैदराबाद मुक्तिसंग्रामातील मराठवाड्याचे योगदान

views

3:11
हैदराबाद मुक्तिसंग्रामात महाराष्ट्रातील मराठवाडा विभागाचे मोठे योगदान आहे. या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, आशाताई वाघमारे इत्यादींनी मोलाचे योगदान दिले. १४ नोव्हेंबर १९३८ रोजी विद्यार्थ्यांनी उस्मानिया विद्यापीठातील वसतिगृहामध्ये ‘वंदे मातरम’ म्हणण्यास प्रारंभ केला. ‘वंदे मातरम’ चळवळीद्वारे विद्यार्थी हैदराबाद मुक्ती लढ्यात सहभागी झाले. तसेच हैदराबाद मुक्तिसंग्रामात वेदप्रकाश, श्यामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्तक, जनार्दन मामा, शोएब उल्ला खान इत्यादींनी हौतात्म्य पत्करले. त्यांचे बलिदान सर्व भारतीयांना प्रेरणादायी ठरले आहे. हैदराबादच्या मुक्तिलढ्यात मराठवाड्यातील नेत्यांचा व जनतेचा सिंहाचा वाटा होता. १७ सप्टेंबर हा हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा दिवस मराठवाड्यात मराठवाड्याचा मुक्तिदिन आणि भारतीय संघराज्यात सामील होण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश १५ ऑगस्ट १९४७ मध्ये झालेला नव्हता. हा प्रदेश १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आला.