स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती

फ्रेंच वसाहतींचे विलीनीकरण

views

4:55
भारत स्वतंत्र झाल्यानंतरही भारतात फ्रेंचांची सत्ता चंद्रनगर, पुदुच्चेरी, कारिकल, माहे व याणम या प्रदेशांवर होती. तेथील रहिवासी भारतात सामील होण्यास उत्सुक होते. हे प्रदेश भारताचेच घटक असल्यामुळे ते भारताच्या स्वाधीन करावेत, अशी मागणी भारत सरकारने केली. फ्रान्सने १९४९ साली चंद्रनगरमधील जनतेचे सार्वमत घेतले. त्यात तेथील जनतेने आम्हांला भारतात सामील व्हायचे आहे असे सांगून भारताच्या बाजूने कौल दिला. आणि अशाप्रकारे चंद्रनगर भारताच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर फ्रान्सने भारताचे इतरही प्रदेश भारत सरकारच्या हाती सोपविले. अशाप्रकारे भारतातील फ्रेंच सत्तेचा शेवट झाला.