बैजिक राशींचे अवयव Go Back a3 – b3 चे अवयव views 4:46 मुलांनो आता आपण a3 – b3 चे अवयव कसे पाडतात ते पाहूया. जसा आपण a3 + b3 चा विस्तार पाहिला अगदी त्याच पद्धतीने a3 – b3 चा विस्तार करणार आहोत. (a - b)3 = a3 – 3a2b + 3ab2 – b3 अशा प्रकारे त्याचा विस्तार आहे. या विस्तार सूत्रातून आपण – 3ab हा सामाईक अवयव घेतला तर त्याची मांडणी (a - b)3 = a3- b3 – 3ab×(a-b) अशा प्रकारे होईल. ∴ a3 – b3 – 3ab × (a-b)= (a-b)3 आता या दोन्ही बाजूंच्या पदांची अदलाबदला करून घेवू. म्हणजेच उजव्या बाजूचे पद डाव्या बाजूला व डाव्या बाजूचे पद उजव्या बाजूला करू.(वजा 3ab चे रूपांतर अधिक 3ab मध्ये होईल). ∴ (a-b)3 = a3 – b3 + 3ab (a-b) इथे (a-b)3 म्हणजे (a-b) हे तीन वेळा घ्यायचे आहेत. म्हणून (a-b)3 विस्तारासाठी आपण [(a - b)(a - b)2] हे विस्तार सूत्र वापरू. ∴ a3- b3 = [(a - b) (a2 – 2ab + b2 + 3ab)]आहे. (a-b)2 कंसाचा वर्ग विस्तार या ठिकाणी वापरला आहे. ∴ a3- b3 = [(a - b) (a2 – 2ab + b2 + 3ab)] येथे – 2 ab मधून + 3ab वजा करू. ∴ a3- b3 = (a - b) (a2 + ab + b2) प्रस्तावना उदाहरण 2) x2 – 10x + 21 चे अवयव पाडा पुढील उदाहरणे a3 + b3 चे अवयव a3 – b3 चे अवयव सोपे रूप द्या गुणोत्तरीय बैजीक राशी