पृष्ठफळ व घनफळ

वृत्तचितीचे पृष्ठफळ

views

5:04
आता आपण वृत्तचितीचे पृष्ठफळ कसे काढतात आणि त्याचे सूत्र काय आहे हे एका कृती मधून जाणून घेऊ. कृती: यासाठी वृत्तचिती आकाराचा डबा घ्या. त्याच्या उंचीएवढी रुंदी असलेला एक आयताकार कागद घ्या. तो डब्याभोवती वक्रपृष्ठभाग नेमका झाकला जाईल असा गुंडाळा. कागदाचा उरलेला भाग कापून वेगळा करा. आता गुंडाळलेला कागद उलगडा. तो आयताकार असल्याचे दिसेल. या आयताचे क्षेत्रफळ, म्हणजे वृत्तचितीच्या वक्राकार भागाचे क्षेत्रफळ म्हणजेच वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ आहे.आयताची लांबी म्हाणजे वर्तुळाच्या तळाचा परीघ व आयताची रुंदी म्हेणजे वृत्तचितीची उंची होय.वृत्तचितीचे वक्रपृष्ठाफळ = आयताचे क्षेत्रफळ =लांबी × रुंदी = वृत्तचितीच्या तळाचा परीघ × वृत्तचितीची उंची यावरून वृत्तचितीचे वक्रपृष्ठकफळ = 2πr × h = 2πrh