वर्तुळ - जीवा व कंस

प्रस्तावना

views

4:06
आपण मागील इयत्तेपासून वर्तुळ व वर्तुळाच्या विविध घटकांविषयी माहिती घेतली आहे. वर्तुळकेंद्र, जीवा, त्रिज्या, व्यास, परीघ यांचा परस्पर संबंध, केंद्रीय कोन, वर्तुळ कंस यांविषयी अभ्यास आपण केला आहे. त्रिज्या: वर्तुळकेंद्रापासून वर्तुळावर काढलेल्या रेषेला वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतात. वर्तुळात असंख्य त्रिज्या काढता येतात. शेजारील आकृतीत रेख AO, रेख OB, रेख OD ही वर्तुळाची त्रिज्या आहे. त्रिज्येमुळे वर्तुळकेंद्राजवळ एक कोन तयार झाला आहे. ∠DOB हा वर्तुळाचा केंद्रीय कोन आहे. व्यास: वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या व वर्तुळकेंद्रातून जाणाऱ्या रेषेला वर्तुळाचा व्यास म्हणतात. व्यास हा त्रिजेच्या दुप्पट असतो व सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो. या आकृतीत रेख AB हा वर्तुळाचा व्यास आहे.