पेशी व पेशीअंगके

प्रस्तावना

views

3:35
पेशींना इंग्रजीमध्ये Cell असे म्हणतात. वनस्पती व प्राणी हे पेशींचे बनलेले असतात. तसेच वनस्पती आणि प्राणी यांचा मुलभूत घटक म्हणजे पेशी होय. काही वनस्पती व प्राणी हे एकपेशीय असतात, तर काही बहुपेशीय असतात. रॉबर्ट हुक या ब्रिटीश शास्त्रज्ञाने 1665 मध्ये पेशींचा शोध लावला. त्यांनी बुचाचा झाडाचा पातळ काप सूक्ष्मदर्शकाखाली ठेवला आणि त्याचे निरीक्षण केले. तर त्यांना मधमाशांच्या पोळ्यासारखे ‘खण’ दिसून आले. त्यांनी या प्रत्येक खणाला ‘पेशी’ हे नाव दिले. तर मॅथिअस श्लायडेन व थिओडर श्वान या जर्मन शास्त्रज्ञांनी १८३८ साली सर्व सजीव हे पेशींचे बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे असे मत मांडले. याआधीही तुम्ही सजीवांमध्ये असणाऱ्या पेशींचा अभ्यास केला आहे.