पेशी व पेशीअंगके

हरितलवक

views

3:41
आता आपण हरितलवकांविषयी माहिती घेऊया. हरितलवकांमुळे वनस्पती स्वत:चे अन्न स्वत: तयार करू शकतात. कारण प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी हरितलवकाची साथ खूपच मोलाची ठरते. आपल्याला हरितलवकाचे आतले आणि बाहेरचे आवरण दिसते. तसेच एकावर एक रचल्याप्रमाणे जी आकृती दिसते तिला लवकणी म्हणतात. आणि जे जलियद्रव दिसते त्याला पीठिका म्हणतात. आतील व बाहेरील आवरणाच्या मध्यावरती असणारी जागाही दिसते. पीठीकेच्या बाजूला थायलॅकॉइड दिसते. तुम्हाला माहीत आहेच की, वनस्पतीच्या पानांत चालणाऱ्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रीयेसाठी हरितलवके मदत करतात. हीच हरितलवके सौरउर्जेचे रासायनिक ऊर्जेत रुपांतर करतात. हरितलवकाच्या पिठीकेमध्ये प्रकशसंश्लेषणासाठी आवश्यक असलेली विकरे, DNA, रायबोझोम्स व पिष्टमय पदार्थ असतात. हरितलवकांची कार्ये: 1) हरितलवके हे सौर ऊर्जा शोषून घेतात आणि सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत म्हणजेच अन्नात रुपांतर करतात. 2) वर्णलवकामुळे विविध फुले, फळे यांना वेगवेगळे रंग प्राप्त होतात. 3) अवर्णलवके पांढरी असतात. अवर्णलवके ही पिष्टमय पदार्थ, मेद व प्रथिनांचे संश्लेषण करतात म्हणजेच शोषून घेतात आणि त्यांची साठवण करून ठेवतात. अशाप्रकारे लवकांचे कार्य खूप महत्त्वाचे आहे.