रासायनिक बदल व रासायनिक बंध

प्रस्तावना

views

3:56
एखादा पदार्थ बदलतो आहे, हे आपल्याला लगेच लक्षात येते. उदा. दुधाचे दही होणे. पाण्याचे बर्फात रुपांतर होणे. असे अनेक पदार्थांमध्ये बदल होत असतात. हे बदल होण्यासाठी काही पदार्थांमध्ये विशिष्ट पद्धतींचा वापर करावा लागतो. तर काही पदार्थांमध्ये निसर्गत:च बदल होतो भौतिक बदलामध्ये मूळ पदार्थांचे संघटन बदलत नाही आणि नवीन पदार्थ तयार होत नाही. तर रासायनिक बदलामध्ये मूळ पदार्थांचे संघटन बदलते आणि नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होतो. बदल: कैरीचा आंबा होणे, बर्फ वितळणे, पाणी उकळणे, पाण्यात मीठ विरघळणे, हिरवं केळं पिवळे होणे, फळ पिकल्यावर सुगंध येणे. बटाटा चिरल्यावर काळा पडणे, फुगलेला फुगा फट्टदिशी फुटणे, फटाका पेटल्यावर आवाज होणे, खाद्यपदार्थ खराब झाल्यावर आंबूस वास येणे. कैरीचा आंबा होणे, हिरवं केळं पिवळे होणे, बटाटा चिरल्यावर काळा पडणे, फुगलेला फुगा फट्टदिशी फुटणे, फटाका पेटल्यावर आवाज होणे, खाद्यपदार्थ खराब झाल्यावर आंबूस वास येणे कोणत्याही पदार्थांमध्ये रासायनिक बदल घडून येताना मूळ पदार्थांचे संघटन बदलते व त्यापासून वेगळे संघटन असलेला नवीन पदार्थ तयार होतो.