रासायनिक बदल व रासायनिक बंध

मानवनिर्मित रासायनिक बदल

views

3:49
आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आपण अनेक रासायनिक बदल घडवून आणत असतो. जसे सोडा-लिंबू ह्या शितपेयात रासायनिक बदल घडवला जातो. कारण त्यामुळे जठराची आम्लता वाढवता येते. तर आता आपण अशा काही मानवनिर्मित रासायनिक बदलांविषयी माहीती घेणार आहोत. इंधनाचे ज्वलन: आपल्याला अनेक दैनंदिन कार्यासाठी इंधनाची गरज भासते. त्यासाठी आपण ऊर्जा मिळवतो. जसे, लाकुड, कोळसा, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस या इंधनाचे ज्वलन केले की आपल्याला ऊर्जा मिळवता येते. या सर्वप्रकारच्या इंधनांच्या ज्वलनामध्ये ज्वलन होणारा पदार्थ कार्बन आहे. ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा संयोग हा हवेतील ऑक्सिजनशी होतो. त्यामुळे कार्बनडाय ऑक्साईड हे उत्पादित तयार होते.