ध्वनी

प्रस्तावना

views

4:37
ध्वनी म्हणजे आवाज हे तुम्हांला माहीत आहे. आपल्या भावना ह्या इतरापर्यंत पोहचवण्यासाठी आपण ध्वनीची मदत घेतो. या पाठात आपण ध्वनीविषयी अधिक माहीती अभ्यासणार आहोत. ध्वनी हा वस्तूच्या कंपनामुळे निर्माण होतो. तुम्ही वीणा किंवा तंबोरा पाहिला असेल. त्याच्या तारांना छेडले की ते कंप पावतात व त्यामधून ध्वनी ऐकू येतो. तर आता आपण ध्वनीची निर्मिती कशी होते हे अभ्यासूया. ध्वनीची निर्मिती: ध्वनी एक प्रकारची ऊर्जाच आहे. ही ऊर्जा आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते. ध्वनीची निर्मिती आघाताने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तू हलल्याने अशा अनेक कारणाने होवू शकते. कंपन ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात. म्हणजेच ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे कंपन होणे गरजेचे असते. वस्तूचे कंपन होत असते तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो.