ध्वनी

ध्वनी प्रसारण आणि माध्यम

views

2:44
आता आपण ध्वनी प्रसारण आणि माध्यम यांच्यातील संबंधाविषयी माहिती अभ्यासूया. ध्वनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो, त्याला माध्यम म्हणतात. यापूर्वी आपण अभ्यासले की हवा, पाणी, स्थायू यांसारख्या एखाद्या माध्यमातून लहरींच्या मार्फत ध्वनी आपल्या कानांपर्यंत पोहोचतो. मात्र ध्वनी व आपला कान यांमध्ये जर माध्यमच नसेल तर आपल्या कानापर्यंत ध्वनी पोहचणारच नाही. त्यामुळे याठिकाणी हे लक्षात घ्यावे लागेल की, ध्वनीच्या निर्मितीसाठी व प्रसारणासाठी हवेसारख्या माध्यमाची गरज असते.