परिसंस्था

भू-परिसंस्था

views

5:08
आपण पृथ्वीवरील भू-परिसंस्थेविषयी माहिती घेऊ. ‘भू’ म्हणजे जमीन आणि भू-परिसंस्था म्हणजे जमिनीवरची परिसंस्था. ज्या परिसंस्था ह्या भू-भागावर म्हणजेच जमिनीवरच असतात, किंवा अस्तित्वात येतात त्यांना ‘भू’ परिसंस्था असे म्हणतात. पृथ्वीवरील अजैविक घटकांचे वितरण हे भूतलावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहे. त्यामुळे वेगवेगळ्या परिसंस्था तयार झाल्या आहेत. जसे, गवताळ प्रदेशातील परिसंस्था, सदाहरित जंगलातील परिसंस्था, उष्ण वाळ्वंटातील परिसंस्था, बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था, तैगा प्रदेशातील परिसंस्था, विषुववृत्तीय वर्षावनांची परिसंस्था इत्यादी परिसंस्था. ज्या प्रदेशांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने झाडे उंच-उंच वाढत नाहीत, त्याठिकाणी गवताळ प्रदेश तयार होत असतात. अशा प्रकारच्या परिसंस्थेमध्ये गवताची मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. जास्त प्रमाणात पडणाऱ्या उन्हामुळे व कमी प्रमाणातील पाऊस असल्यामुळे खुरट्या वनस्पतींची वाढ होत असते. अशा ठिकाणी शेळी, मेंढी, जिराफ, हत्ती, झेब्रा, हरिण, चितळ, वाघ, सिंह असे प्राणी आढळून येतात. तसेच वेगवेगळे पक्षी कीटक व सूक्ष्मजीव आढळून येतात.