परिसंस्था

मानवी हस्तक्षेपामुळे होणारा परिसंस्थांचा ऱ्हास

views

5:55
मानवाचे जीवन सुरळीत चालण्यासाठी परिसंस्था खूप महत्त्वपूर्ण आहेत. परंतु मानवाच्या हव्यासापोटी या परिसंस्थाचा आज ऱ्हास होत आहे. मानवाने स्वत:चे जीवन सुलभ व सोयीस्कर होण्यासाठी पर्यावरणाची हानी केली आहे. त्यामुळे यामध्ये असणाऱ्या परिसंस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जसे खाणकाम, वृक्षतोड करून जमिनीचा वापर आपण वेगवेगळ्या कारणांसाठी करतो. त्यामुळे त्याठिकाणी असणाऱ्या सजीव व निर्जीव घटकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. मानवाने आज बरीच प्रगती केली आहे. मात्र याचबरोबर या प्रगतीसाठी मानव परिसंस्थेची वाढ ज्या ठिकाणी होते त्या जागेचा वापर करत आहे.