क्षेत्रभेट

तालुका व जिल्हा निवडणूक कार्यालयाला भेट

views

4:32
या पाठात निवडणूक कार्यालयाला भेट देऊन माहिती जमा करण्यासाठी प्रश्नावलीचा एक नमुना आपल्याला दिला आहे. त्याचे आपण वाचन करू. 1) कार्यालयाचे नाव. 2) या कार्यालयाशी संबंधित प्रमुखाचे पद कोणते आहे? 3) या कार्यालयामार्फत कोणकोणती कामे केली जातात? 4) निवडणूक विभागाचे कार्य कोणाच्या निर्देशानुसार चालते? 5) कार्यालयामार्फत कोणकोणत्या निवडणुका घेतल्या जातात? 6) निवडणुकीसाठी आवश्यक असलेले अधिक मनुष्यबळ कोठून उपलब्ध केले जाते? 7) निवडणुकीची सूचना किती दिवस आधी दिली जाते? 8) निवडणुकीसाठी नवीन मतदारांची नोंद करणे आणि मतदारयाद्या अद्ययावत करणे ही कामे कोणामार्फत केली जातात? 9) निवडणुकीसाठीचे प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्यक्षपणे कोण घेते? 10) निवडणुकीदरम्यान कोणकोणते परवाने आपल्या कार्यालयाकडून दिले जातात. 11) प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदान केंद्रावर किती व्यक्तींची नियुक्ती केली जाते? 12) निवडणुकीचे काम करणाऱ्या व्यक्तींचे मतदान केव्हा घेतले जाते? कसे? 13) मतदान करण्याची वेळ कोणती असते? आपण क्षेत्रभेटीला गेलो म्हणजे प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन तेथील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या कार्यालयाची, पदाची, तालाठ्याच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. आता आपण मिळवलेल्या माहितीचा अहवाल तयार करणे गरजेचे असते.