क्षेत्रभेट Go Back अहवाल लेखन views 5:03 क्षेत्रभेटी दरम्यान आपण जी काही माहिती मिळवली असेल त्या सर्व माहितीचे अहवाल लेखन करावे लागते. त्यात नकाशे, तक्ते-आराखडे, आलेख, चित्रे, छायाचित्रे यांचाही उपयोग करता येतो. आता आपण तलाठी कार्यालयास दिलेल्या भेटीचे अहवाल लेखन करू. त्यासाठी पुढील मुद्द्यांचा आधार घेऊ. 1)प्रस्तावना 2) कार्यालयातील कार्यरत कर्मचारी 3)कार्यालयाचे कार्य 4)येणाऱ्या समस्या/उपाययोजना 5)आभार 6)संदर्भसूची. आमच्या शाळेतील इयत्ता आठवीचा वर्ग तलाठी कार्यालयाची माहिती घेण्यासाठी आमच्या शेजारच्या गावात क्षेत्रभेटीसाठी दि. 23/12/2018 रोजी सकाळी 10 वाजता गेला. या क्षेत्रभेटीतून आम्हांला संपूर्ण तलाठी कार्यालयाच्या कामाचे संपूर्ण स्वरूप, कार्यक्षेत्र, अधिकार यांसारख्या अनेक बाबी जाणून घेता आल्या. गाव पातळीवर अतिशय महत्त्वाच्या व उपयुक्त अशा तलाठी या अधिकाऱ्याविषयी माहिती घेता आली. प्रस्तावना तालुका व जिल्हा निवडणूक कार्यालयाला भेट अहवाल लेखन