वजाबाकीने कमी करूया

प्रस्तावना

views

3:39
आज आपण वजाबाकीने कमी करायला शिकणार आहोत. तुम्हांला माहीतच आहे की, वजाबाकी म्हणजे कमी करणे, उणे करणे. आता आपण एक उदाहरण सोडवू. क्षितिजकडे ५ कप होते, त्याने आचलला ३ कप दिले. तर क्षितिजकडे किती कप उरले? ५ मधून १, २, ३ कमी केले. म्हणजे २ शिल्लक राहिले. आता हेच गणित आपण उभ्या मांडणीत लिहू. ५ हा एकक स्थानचा अंक आहे आणि ३ हा सुद्धा एकक स्थानचाच अंक आहे. म्हणून आपण दोन्ही अंक एककाच्या घरात लिहून त्यांची वजाबाकी करू. आणि उत्तरात २ अंक लिहू. तर मुलांनो क्षितिजने ५ कपांपैकी ३ कप आचलला दिल्यामुळे त्याच्याकडे २ कप उरले. उदा.1) हे पहा इथे वरच्या ओळीत ८ आकाश कंदील आणि खालच्या ओळीत ४ पणत्या दिल्या आहेत. तर सांगा आकाश कंदील पणत्यांपेक्षा किती जास्त आहेत? पहा ही वजाबाकी कशी करायची. आपण एकेका आकाशकंदील आणि पणतीची जोडी लावू. ही पहिली जोडी, दुसरी जोडी, तिसरी जोडी, चौथी जोडी जुळली. आता सर्व पणत्या संपल्या. पुढे जोडी जुळवण्यासाठी एकही पणती उरली नाही. पण अजूनही १,२,३,४ आकाशकंदील उरले आहेत. म्हणजेच ८ मधून ४ वजा केल्यास ४ उरतात. म्हणून पणत्यांपेक्षा ४ आकाशकंदील जास्त आहेत. म्हणजेच ८ – ४ = ४.