वजाबाकीने कमी करूया

वजाबाकी मागे मोजून

views

3:35
माझ्याकडे हा तक्ता आहे. यावर आपण ४९ ठोकळे ठेवूया. मात्र हे लक्षात ठेवा, की एकावेळी ५ किंवा ५ पेक्षा कमी ठोकळे उचलायचे पण शून्य ठोकळे उचलता येणार नाहीत. प्रत्येक वेळी प्रत्येकाला एकच संधी मिळेल. शेवटचा ठोकला जो उचलेल तो हरला. रमा तू खेळाची सुरुवात कर. पहा, रमाने ४९ पासून मागे मोजून चार ठोकळे उचलले. आता ४९ मधून ४ कमी झाले म्हणजे उरले ४५ ठोकळे. आता यशने ५ ठोकळे उचलले राहिले ४०. पुन्हा रमाने ५ ठोकळे उचलले. राहिले ३५. आता यशने ४ ठोकळे उचलले. राहिले ३१. आता रमाने 3 ठोकळे उचलले. राहिले २८. आता यशने ५ ठोकळे उचलले. राहिले २३. पुन्हा रमाने ५ ठोकळे उचलले. राहिले १८. आता यशने ५ ठोकळे उचलले. राहिले १३. रमाने ५ ठोकळे उचलले. राहिले ८. आता यशने ४ ठोकळे उचलले. राहिले ४. रमाने ३ ठोकळे उचलले. राहिला १. शेवटी यशने शिल्लक राहिलेला १ ठोकळा उचलला. राहिला ०. म्हणजे इथे शेवटचा ठोकळा यशने उचलला म्हणून यश हरला आणि रमा जिंकली. आहे ना मजा या खेळात?