पाढे तयार करूया

५ चा पाढा

views

3:29
आता आपण ५ चा पाढा तयार करू. ज्याप्रमाणे आपण पेरुंचे उदाहरण घेऊन ४ चा पाढा तयार केला होता त्याच पद्धतीने हा ५ चा पाढा पुढच्या संख्या मोजून तयार करू. पण यामध्ये मात्र आलेल्या उत्तरात पुन्हा ५ मिळवायचे आणि पुढचा पाढा तयार करायचा आहे. ५ एक वेळा मोजून ५ झाले म्हणून उत्तरातही ५ च लिहिले. आता पाच २ वेळा मोजून ५+५= १० झाले. पाच ३ वेळा मोजून, इथे आधीच्या उत्तरातील १० च्या पुढे ५ मोजायचे आहे. म्हणून १०+५=१५ झाले. पाच ४ वेळा मोजून, आधीच्या उत्तरातील १५ च्या पुढे ५ मोजायचे आहे. म्हणून १५ + ५ = २० झाले. पाच ५ वेळा मोजून, आधीच्या उत्तरातील २० च्या पुढे ५ मोजायचे आहे. म्हणून २० + ५ = २५ झाले. पाच ६ वेळा मोजून, आधीच्या उत्तरातील २५ च्या पुढे ५ मोजायचे आहे. म्हणून २५ + ५ = ३० झाले. पाच ७ वेळा मोजून, आधीच्या उत्तरातील ३० च्या पुढे ५ मोजायचे आहे. म्हणून ३० + ५ = ३५ झाले. पाच ८ वेळा मोजून, आधीच्या उत्तरातील ३५ च्या पुढे ५ मोजायचे आहे. म्हणून ३५ + ५ = ४० झाले. पाच ९ वेळा मोजून, आधीच्या उत्तरातील ४० च्या पुढे ५ मोजायचे आहे. म्हणून ४० + ५ = ४५ झाले. पाच १० वेळा मोजून, आधीच्या उत्तरातील ४५ च्या पुढे ५ मोजायचे आहे. म्हणून ४५ + ५ = ५० झाले.