सेन्सिंग

सेन्सिंग ब्लॉकचे फायदे

views

07:03
स्क्रॅच वापरून तयार केलेल्या अॅनिमेशनमध्ये बदल करण्यासाठी सेन्सिंग ब्लॉक या पर्यायाचा वापर करता येतो. एखाद्या गेममध्ये एका रंगाचा बॉल दुसऱ्या रंगाच्या बॉलवर आदळला कि काही बदल घडून येतात, हे तुम्ही पहिलेच असेल. हे काम सेन्सिंग ब्लॉक करतो. असे बदल वेगवेगळ्या प्रकारे घडवून आणता येतात. एका स्प्राईटचा दुसऱ्या स्प्राईटला स्पर्श झाल्यावर, एखाद्या रंगाचा स्प्राइटला स्पर्श झाल्यावर किंवा स्प्राइटमधील एखाद्या रंगाचा दुसऱ्या कोणत्याही रंगाला स्पर्श झाल्यावर असा बदल घडवून आणता येतो. किंवा की बोर्डवरील एखादी ठरलेली की प्रेस केल्यावरही असा बदल आपण करू शकतो. अॅनिमेशनमध्ये असे सर्व बदल करण्याकरिता सेन्सिंग ब्लॉकमध्ये तसे ब्लॉक्स आहेत. त्यामधील काही महत्वाच्या ब्लॉक्सची माहिती आज आपण करून घेणार आहोत.