भूमितीमधील मूलभूत संबोध

रेषा, रेषाखंड ,किरण

views

4:32
रेषा, रेषाखंड ,किरण आता आपण भूमितीमधील मूलभूत संबोध रेषा, रेषाखंड आणि किरण यांची माहिती घेऊ. रेषा समजा मी फळ्यावर दोन बिंदू घेतले.त्यांना अनुक्रमे P व Q ही नावं दिली. हे बिंदू पटटीने जोडले असता आपल्याला रेघ PQ मिळाली . ही रेघ बिंदू p च्या व Q च्या बाजूने वाढवली तर ती फळा संपेपर्यंत वाढवता येईल . फळा आणखी मोठा असेल तर ही रेघ आणखी मोठी काढता येईल. इतकेच काय तर ही रेघ आपल्याला फळ्याच्या बाहेरही अमर्यादेपर्यंत काढता येईल . अशा दोन्ही बाजूंनी अमर्याद असणाऱ्या रेघेला ‘रेषा’ म्हणतात. रेषेला नाव देण्यासाठी रेषेवर रेषेच्या दोन्ही टोकांना बाण काढतात. बाणाजवळ प्रत्येकी एक बिंदू घेऊन त्या बिदुंना नावे देतात उदा. बिंदू A व बिंदू B . त्या रेषेचे वाचन रेषा AB किवा रेषा BA असे करतात. या रेषेची वैशिष्ट्ये म्हणजे रेषेला आरंभ आणि अंत्यबिंदू नसतो. रेषेची लांबी अमर्याद असते . रेषाखंड रेषा अमर्याद असते हे तुम्हाला माहीत आहे. ह्या रेषेचा एक तुकडा म्हणजेच ठरावीक लांबीचा खंड घेतला तर त्याला आपण रेषाखंड म्हणतो. रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखविणारे बिंदू असतात, त्यांना अंत्यबिंदू म्हणतात . नाव :- खंड म्हणजे तुकडा. आणि रेषेवरील दोन अंत्यबिंदू जोडणारा भाग म्हणजेच रेषाखंड. रेषाखंडाला नाव देताना रेषाखंडाच्या अंत्यबिंदूना नाव देतात. जसे या आकृती मध्ये दिलेल्या रेषाखंडांना रेषाखंड MN किंवा रेषाखंड NM तसेच रेषाखंड RS किंवा रेषाखंड SR असेही म्हणू शकतो .