भूमितीमधील मूलभूत संबोध

प्रतल

views

2:48
प्रतल :- मुलांनो आपल्या वर्गाच्या ह्या चार भिंती, आपल्या पायाखालची जमीन, ह्या टेबलाचा पृष्ठभाग ,फळा, तुमच्या बेंचचा डेस्क हे सर्व सपाट पृष्ठभाग आहेत. पण हे मर्यादित आहेत. म्हणजेच यांची लांबी, रुंदी निश्चित आहे. हे सपाट पृष्ठभाग एका अमर्याद पृष्ठाचा भाग आहेत. अशा सर्व दिशांनी अमर्याद वाढणाऱ्या सपाट पृष्ठभागाला प्रतल म्हणतात. प्रतल दर्शवण्यासाठी एक आयत किवा समांतरभुज चौकोन काढतात. त्याच्या एका कोपऱ्यात इंग्रजी कॅपिटल अक्षर लिहितात. हे अक्षर म्हणजे त्या प्रतलाचे नाव असते .प्रतल सर्व दिशांनी अमर्याद असतो आणि हे समजण्यासाठी प्रतलाच्या चारही बाजूंना अमर्यादा दाखविणारे बाण काढले जातत. कसे ते शेजारील आकृतीत दाखविले आहेत. बाजूच्या आकृतीत पहा. यात प्रतल A काढले आहे. या A प्रतलात रेषा P आणि रेषा L आहेत. या रेषा एकमेकींना समांतर आहेत. या रेषा आपण कितीही पुढेपर्यंत अशाच सरळ रेषेत काढत राहिलो तरीही त्या कधीही एकमेकांना छेदणार नाहीत. कारण त्या एकाच प्रतलात आहेत. तर अशा एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. म्हणून A या प्रतलातील रेषा P व रेषा L या समांतर रेषा आहेत. यांना रेषा P समांतर रेषा L असे लिहितात. आतापर्यंत आपण बिंदू, रेषा, किरण, रेषाखंड, प्रतल आणि समांतर रेषा यांची माहिती घेतली आहे.