स्तंभालेख

स्तंभालेख काढणे

views

4:55
स्तंभालेख काढणे : बाई: मुलांनो, दिलेली संख्यात्मक माहिती स्तंभालेखाच्या मदतीने कशी समजून घ्यायची हे आपण यापूर्वी पाहिले. आज आपण दिलेल्या संख्यात्मक माहितीवरून स्तंभालेख कसा काढायचा ते पाहूया. यासाठी आपण एक उदाहरण सोडवू. पहा : एका रोपवाटिकेतील रोपांची माहिती खाली दिली आहे. या रोपवाटिकेत एकूण मोगऱ्याची रोपे आहेत 70, जाईची रोपे आहेत 50, जास्वंद आहेत 45 आणि शेवंतीची रोपे आहेत 80. आणि आता आपल्याला यांचा स्तंभालेख काढायचा आहे. . यासाठी आपण प्रथम एक आलेख कागद घेऊ. या आलेख कागदावर मध्यभागी रोपांचे प्रकार व संख्या असे शीर्षक लिहू. खालच्या बाजूस आडवी रेघ काढून तिला X अक्ष असे नाव देऊ. आता याच रेषेला काटकोन करणारी एक उभी रेषा कागदाच्या डाव्या बाजूला काढू. तिला YY अक्ष असे नाव देऊ. आता या दोघांना छेदणाऱ्या छेदनबिंदूला OO असे नाव देऊ. आता पहा सर्वात जास्त रोपे म्हणजे 80 रोपे शेवंतीची आहेत. म्हणजे आपल्याला YY अक्षावर किमान 80 किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांचे सेंटीमीटर मध्ये भाग पाडावे लागतील. जर आपण हे भाग 1 च्या पटीत पाडले तर आपला स्तंभ खूप मोठा होईल. त्यामुळे आपण याचे 5 च्या पटीत भाग पाडू. म्हणजेच 0.5 सेमी = 5 रोपे असतील आणि 1 सेमी ला 10 रोपे, 1.5 सेमी ला 15 रोपे. पुढे अशाच प्रकारे हे प्रमाण वाढत जाईल. कागदाच्या उजवीकडे वरच्या बाजूने हे प्रमाण लिहू. यानंतर X अक्षावर सर्व रोपांची नावें सारख्या अंतरावर लिहू. आता प्रत्येक रोपाच्या नावावर XX अक्षावर दिलेल्या रोपांच्या संख्येइतका योग्य उंचीचा स्तंभ काढू. म्हणजे मोगऱ्याचा स्तंभ 70 सेमी पर्यंत आहे, जाई च्या रोपांचा स्तंभ 50 सेमी पर्यंत आहे, जास्वंदी च्या रोपांचा स्तंभ 35 सेमी पर्यंत आहे आणि शेवंतीच्या रोपांचा स्तंभ सर्वात मोठा म्हणजे 80 सेमी पर्यंत आहे . तर अशाप्रकारे आपला स्तंभालेख तयार झाला आहे. (पाठ्यपुस्तकातील पान क्र. ३८ वरील स्तंभ दाखवा)